एका भयंकर अपघातात तीन पिढ्यांचा झाला शेवट!! दुःखद घटनेने महाराष्ट्र हादरला..

सांगली : एका भीषण अपघाताने सध्या महाराष्ट्र हादरला आहे. सांगली-भिलवडी मार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अपघातात आजी, आजोबा आणि त्यांच्या पाच वर्षांच्या नातवाचा जागीच मृत्यू झाला. कार आणि दुचाकीचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातात कारमधील चार शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे शिक्षक दिनाचा उत्साह आणि पुरस्काराचा आनंद घेऊन परतणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर दुःखाचा डोंगर उभा राहिला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तासगाव शहराजवळ असलेल्या चेतना पेट्रोल पंपाजवळ एक भीषण अपघात घडला.
समोरून वेगाने येणाऱ्या मारुती सुझुकी एर्टिगा गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. भीषण अपघातात दुचाकीवरील तिघेही हवेत उडाल्यानंतर खाली कोसळले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला द्राक्षबागेत जाऊन पडली. याबाबत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातात एकाच दुचाकीवरील आजी, आजोबा आणि त्यांच्या पाच वर्षांच्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्वजण पलूस तालुक्यातील बुर्ली गावचे रहिवासी होते. अपघातामुळे एका क्षणात एका कुटुंबाचा प्रवास संपला. तसेच दुसऱ्या कुटुंबाचा आनंद दु:खात बदलला. याबाबत तपास सुरू आहे.
एर्टिगा गाडीत सांगलीतील एका नामांकित शिक्षण संस्थेतील शिक्षक होते. हे सर्वजण कडेपूर येथील आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याला गेले होते. अपघातानंतर जखमींना लगेच रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.