कॉलेजच्या तिघांचा मृत्यू, पहाटे घराबाहेर पडले अन् घडलं विपरीत, घात की अपघात? घटनेने सोलापूरमध्ये खळबळ


सोलापूर : येथील कॉलेजातील तीन तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे तिन्ही मित्र पहाटे घराबाहेर पडले होते. ते परत आलेच नाही. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. मात्र याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.
घटनेतील एकजण गोसेवक असल्याने हा अपघात आहे की घातपात? असा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे. अपघातामुळे तिन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. तिघांनाही पहाटे बाहेर जाण्याची गरज काय होती? असा प्रश्न निर्माण होत आहे.

त्यांना कुणी बोलावलं होतं का? असे प्रश्न स्थानिकांना पडले असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. नागेश गवंडी, रोहन पोरे, बसवराज चनशेट्टी अशी मृत तरुणांची नावे आहेत. तिघेही एकाच गावचे असून एकाच कॉलेजात शिकत होते, अशी माहिती आहे.

यातील एक एक तरुण गोसेवक असल्याने हा अपघात की घातपात याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या घटनेने एकच खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू आहे. याबाबत कुटूंबातील सदस्यांनी सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यामुळे याबाबत अजून कोणते वेगळे वळण लागणार का? हे लवकरच समोर येईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!