हडपसर परिसरात दहशत माजविणाऱ्या ‘कोयता’ गॅंग च्या तिघांना अटक …!
हडपसर : हडपसर परिसरात कोयता घेऊन दहशत माजविणार्या तसेच दरोडा , खुनाचा प्रयत्न अशा गुन्हांत फरारी असलेल्या दोघांना हडपसर पोलिस ठाण्याच्या पथकाने शिरूर येथील पाबळमधील रानात पाठलाग करून पकडुन अटक केली आहे.
हडपसर पोलिसांनी अटक केलेल्या कोयता गॅंगमधील मुख्य आरोपी बिट्या संजय कुचेकर (22, हडपसर) आणि पंकज गोरख वाघमारे (28, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हडपसर परिसरात ३ जानेवारीला घडलेल्या दरोडा व खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात कोयता टोळीतील बिट्या कुचेकर आणि पंकज वाघमारे हे फरार झाले होते.
दरम्यान हडपसर पथकातील अंमलदार निखील पवार, समीर पांडुळे, शाहिद शेख, प्रशांत दुधाळ पाबळ येथे गेले. ते पोलिसांची चाहूल लागताच त्यांना पाहून शेतातून पळून जात असताना पथकाने त्यांना पाठलाग करून पकडले आहे.
Views:
[jp_post_view]