मुंबईत पुन्हा अतिरेकी! पुणे नियंत्रण कक्षाला अमेरिकेतून धमकीचा फोन, पोलिस यंत्रणा सावध…
पुणे : पुण्यातील नियंत्रण कक्षाला अमेरिकेतून धमकीवजा फोन आल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच फोनवरील व्यक्तीने मुंबईत राहणारा एक व्यक्ती अतिरेकी असल्याचे सांगून फोन कट केला.
याबाबतची माहिती पुणे नियंत्रण कक्षाने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. पुणे नियंत्रण कक्षाने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली असता, मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाने संबधित फोन करणार्या व्यक्तीचे लोकेशन तपासले असता ते अमेरिकेचे निघाले.
मिळलेल्या माहिती नुसार, पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन आला. फोनवरील व्यक्तीने मुंबईत राहणारा एक व्यक्ती अतिरेकी असल्याचे सांगून फोन कट केला. मुंबई आणि पुणे शहरात नुकतेच दहशतवादी सापडले होते.
या घटनांचा पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा फोन गांभीर्याने घेतला आहे. पुणे पोलिसांनी याबाबतची माहिती लागलीच मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला दिली आहे.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाने संबधित फोन करणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन तपासले असता ते अमेरिकेचे निघाले. यामुळे फोन अमेरिकेतूनच आल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, त्या व्यक्तीला पोलिसांनी नियंत्रण कक्षातून फोन केला असता. त्याने अधिक माहिती दिली नाही. मात्र घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिस तपास करत आहेत. मात्र हा एक खोडसाळ पणा केल्याचा पोलिसांना संशय आहे.