केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानाला बॉम्बने उडवण्याची धमकी ; नागपुरात खळबळ, परिसरात सुरक्षा वाढवल्या..

पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याने उपराजधानी असलेल्या नागपुरात खळबळ उडाली आहे. धमकी देणारा फोन हा एका अनोळख्या व्यक्तीचा होता. या धमकीनंतर नागपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तपासणी केली आहे.गडकरी यांच्या महाल आणि वर्धा रोडवरील निवासस्थानाची पोलिसांनी कसून तपासणी केली. पण, तपासणीत कोणताही संशयास्पद वस्तू किंवा पुरावा आढळला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी रात्री फोन वरून देण्यात आली होती. पोलिसांनी धमकीचा कॉल करणाऱ्याला अटक केल्याची प्रथमिक माहिती मिळाली आहे. पोलीस कंट्रोल रूमला रात्री कॉल करून धमकी दिली होती.त्यानंतर त्यांच्या निवासस्थानाभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे..प्रताप नगर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा फोन नेमका कोणत्यां घराला उडवून देण्यासाठी आला होता हे स्पष्ट नसल्याने, पोलिसांनी नागपुराय वर्धा रोड आणि महाल परिसरात बांधकाम सुरू असलेल्या घराची सुद्धा तपासणी करण्यात आली. पण यात काहीच मिळून आलं नाही. त्यानंतर अखेर धमकी देणाऱ्यास अटक करण्यात आलीं आहे.उमेश राऊत असं अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे. पुढील प्रकरणाचा तपास पोलीस घेत आहेत.
दरम्यान यापूर्वीही २०२३ मध्ये गडकरी यांना बेळगाव कारागृहातील कैदी जयेश पुजारी याने खंडणीसाठी धमकी दिली होती. त्यावेळी या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा देखील सहभागी झाली होती. सध्या पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा या नव्या धमकीच्या मुळाशी जाण्यासाठी सखोल तपास करत आहेत.