पुन्हा नोटबंदी?, 2 हजाराची नोट होणार बंद! तुमच्याकडे असेल तर लवकर करा ‘हे’ काम…
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली आहे. यापुढे या नोटा छापल्या जाणार नाहीत. तसेच या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत कायदेशीरित्या वैध राहतील. त्यामुळे सध्या बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार आहेत.
मात्र त्यापूर्वी बँकेतून बदलून घ्याव्या लागणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत आरबीआयने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. ग्राहकांना २ हजार रुपयांच्या नोटा देणं तातडीने थांबवा, असे आदेश रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना दिले आहेत.
तसेच क्लिन नोट पॉलिसी’च्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. भारतीय रिजर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करणार असल्याची घोषणा केलीये.
एका वेळी एवढ्या नोट बदलता येणार
एकावेळी फक्त 2 हजार रुपयांच्या नोटा 20 हजार रुपयांपर्यंत बदलू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर 2000 हजार रुपयांची नोट चलनात आली. नोटाबंदीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या.