उरुळी कांचनमध्ये भरदिवसा घरफोडी ; साडेसात लाखांच्या सोन्याचे दागिने लंपास…!


उरुळी कांचन : उरुळीकांचन (ता.हवेली ) येथील ग्रामपंचायत हद्दीतील दातार कॉलनी येथे बंद घरातून भरदिवसा १५ तोळे सोने चोरीला जाण्याचा प्रकार आज (दि. ०८) रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी तब्बल साडे सात लाखांचे १५ तोळे सोन्याचे दागिने भरदिवसा लंपास केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन लक्ष्मण कुंभार (वय- ३०) असे चोरी झालेल्या घरमालकाचे नाव आहे. त्यांच्या आई ह्या गृहिणी आहेत . काल महिला दिना निम्मित कुंभार यांची आई उरुळी कांचन येथील एका कार्यक्रमाला घराला कुलूप लावून गेल्या असता , दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सचिन यांचे बंधू उमेश कुंभार हे जेवण करण्यासाठी घरी आले तेव्हा त्यांना घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील साहित्य हे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आले असता याची माहिती त्यांनी आईला दिली.

याचदरम्यान , पाहणी केली असता कपाटात ठेवलेले तब्बल साडे सात लाखांचे १५ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याचे निदर्शनास आले. लोणी काळभोर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, पोलीस हवालदार कुलकर्णी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!