मान्सून मध्ये यंदाच्या वर्षी मोठा बदल ! सरासरी कमी पाऊस पडण्याची शक्यता…!

मुंबई : महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी वादळाची स्थिती निर्माण होत असल्याने तुफान पाऊस व्हायचा परंतु यंदा क्षमतेपेक्षा पाऊस कमी होणार असल्याचे हवामान तज्ञांनी शक्यता व्यक्त केली आहे.

पुढील तीन महिने म्हणजे 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिलदरम्यान एनसो-न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता आहे. अमेरिकन संस्था नॅशनल ओशिनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, मे ते जुलैदरम्यान ‘अल-नीनो’ची स्थिती राहू शकते. याच काळात जूनमध्ये मॉन्सून दाखल होतो.
जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळ्याचा असतो. तज्ज्ञांनुसार, अल-नीनो वर्षांमध्ये दुष्काळाची शक्यता ६० टक्के, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता ३० टक्के व केवळ १० टक्के सरासरी पावसाची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

२६ वर्षांत ५ वेळा अल-नीनो स्थिती राहिली आहे. त्यामध्ये चार वेळा देशात दुष्काळ पडला. २००२ मध्ये भारतात ८१ टक्के, २००९ मध्ये ७८ टक्के पाऊस झाला. दरम्यान आता अल-नीनो प्रभावाचा पुढील
९महिन्यांसाठी अंदाज उपलब्ध आहे. २००४, २००९, २०१४ व २०१८ मधील अंदाजही २०२१ सारखेच आहेत. यामुळे मागच्या काही काळात दुष्काळ झाला त्या प्रमाणे २०२३लाही दुष्काळ पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होत आहेत. कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. या तापमानातील चढ उताराचा शेती पिकांवर देखील परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे.
दरम्यान , 12,13 आणि 14 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.