देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांच्या यादीत महाराष्ट्रातील ‘या’ मंदिराचा समावेश, भक्तांकडून करोडोची देणगी, जाणून घ्या…

पुणे : भारतातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भक्त गर्दी करतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्री रामरायांचे भव्य असे मंदिर बांधून तयार झाले आणि त्याचा उद्घाटन सोहळा हा फारच नेत्रदीपक राहिला. यामुळे याठिकाणी देखील हिंदू धर्मातील लोकं गर्दी करत असतात.

मंदिरांमध्ये दिले जाणारे दान दरवर्षी वाढतच आहे. मंदिरांमध्ये दान म्हणून दिल्या जाणाऱ्या रकमेचा आकडा सातत्याने वाढत आहे. सर्वाधिक श्रीमंत देवस्थानाच्या यादीत महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. दरवर्षी शिर्डीत लाखो भाविक येतात आणि उदार हस्ते दानधर्म करतात.
क्षेत्र शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिराला दरवर्षी 400 कोटी रुपयांची देणगी मिळते. देश-विदेशातील भाविक या मंदिरात दानधर्म करतात. अनेकांची श्रद्धा याठिकाणी आहे. उत्तर भारतातील अनेक लोक देखील याठिकाणी आवर्जून येतात. या मंदिरात भाविक रोख रकमेव्यतिरिक्त सोने-चांदी, हिरे अशा मौल्यवान वस्तू सुद्धा दान करतात.

सध्या साईबाबा मंदिराची एकूण मालमत्ता 1800 कोटी रुपये एवढी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पद्मनाभस्वामी मंदिर केरळ हे मंदिर जगातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांच्या यादीत येते. या मंदिराला आपण भारतातील सर्वाधिक श्रीमंत मंदिर असं म्हणू शकतो.
या मंदिराची एकूण मालमत्ता एक लाख वीस हजार कोटी रुपये इतकी आहे. तसेच तिरुमाला तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर, आंध्र प्रदेश आंध्रप्रदेश हे मंदिर देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांच्या यादीत शीर्षस्थानी आहे. हे पवित्र मंदिर देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
तिरुपती बालाजी मंदिराला दरवर्षी चौदाशे ते सोळाशे कोटी रुपयांची देणगी मिळते. याठिकाणी देखील भारतातील मोठ्या प्रमाणावर भक्त येत असतात. यामुळे याठिकाणी मोठी गर्दी होत असते. अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर दाण याठिकाणी करतात.