पुणेकरांसाठी मोठी बातमी! उद्यापासून ४ दिवस ‘हा’ रस्ता वाहतुकीसाठी बंद, जाणून घ्या..


पुणे : बाणेर रस्त्यावर ग्रीन पार्क हॉटेल जंक्शन ते पल्लोड फार्म दरम्यान मेट्रोचे काम केले जाणार आहे. त्यामुळे १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान या रस्त्यावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

हे आहेत पर्यायी मार्ग…

पुणे विद्यापीठ चौकाकडून अभिमान श्री जंक्शन येथून बाणेरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी बाणेर फाटा चौकामधून उजवीकडे वळावे. ‘आयटीआय’ रस्त्यावरून परिहार चौक, डावीकडे वळण घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे, नागरस रस्त्यावरून महाबळेश्वर हॉटेलजवळ बाणेर रस्त्यावर जावे.

ग्रीन पार्क हॉटेल चौकामधून डावीकडे वळण घेऊन सोमेश्वर मंदिरमार्गे राम नदीवरील पुलानंतर उजवीकडे वळण घेऊन पासपोर्ट कार्यालयासमोरून बाणेर रस्त्यावर यावे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम बाणेर रस्त्यावर सुरू आहे. बाणेर रस्त्यावर ग्रीन पार्क हॉटेल जंक्शन ते पल्लोड फार्म दरम्यान मेट्रोकडून ‘पोर्टल बीम’ बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे चार दिवस या रस्त्यावरील वाहतूक बंद केली जाणार आहे.

दरम्यान,मेट्रोच्या कामामुळे रस्ता बंद राहणार असल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) पाच मार्गांवरील बसचे मार्गदेखील बदलण्यात आले आहेत. बस बाणेरकडे जाताना बाणेरफाटा चौकातून उजवीकडे वळून सर्जा हॉटेल, औंध आयटीआय.

परिहार चौकातून पुढे डावीकडे वळण घेऊन डीपी रस्त्याने आंबेडकर चौक येथून उजवीकडे वळण घेऊन मिडी पॉइंट हॉस्पिटलपासून डावीकडे वळण घेऊन लिंक रस्त्याने ताम्हाणे चौकातून डावीकडे वळण घेऊन कपिल मल्हार चौकातून बाणेर बस थांब्यावर येतील. त्यानंतर पुढे पूर्ववत मार्गाने बसचे संचलन सुरू राहील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!