पुणेकरांनो सावधान! कारमधून प्रवास करताना ‘ही’ चूक ठरली महाग; शिरूर येथे भरदिवसा घडलं धक्कादायक कृत्य…


शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हॉटेलसमोर पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्याने तब्बल 1 लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, संबंधित प्रवासी कारने प्रवास करत असताना जेवणासाठी हॉटेलसमोर थांबले होते. त्यांनी गाडी पार्क करून ते आत गेले. याच संधीचा फायदा घेत चोरटा गाडीभोवती फिरत राहिला आणि आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून काही क्षणातच काच फोडून आत ठेवलेली रोकड घेऊन पसार झाला.

प्रवासी जेवण करून परतल्यानंतर गाडीची काच फुटलेली दिसली. तपासणी केली असता आत ठेवलेले पैसे चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशयित व्यक्ती कारजवळ येताना, काच फोडताना आणि पैसे काढून पळताना स्पष्ट दिसत आहे. अवघ्या काही मिनिटांत हा प्रकार घडला.

दरम्यान, घटनेनंतर वाहनधारकाने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. भरवस्तीत आणि हॉटेलसमोर अशा प्रकारची चोरी झाल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ही घटना पुन्हा एकदा सांगते की, प्रवास करताना छोटीशी चूकही मोठं नुकसान करून जाऊ शकते. त्यामुळे सतर्क राहणं आणि सुरक्षेच्या उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!