सरकारी नोकरी करण्याची हीच ती संधी! स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मेगा भरती, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज..

पुणे : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कडून मेगा भरती जाहीर झाली असून एकूण ६,५८९ पदांसाठी प्रोबेशनरी ऑफिसर पदभरती केली जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी २६ ऑगस्ट २०२५ ही शेवटची तारीख लक्षात ठेवून तातडीने अर्ज करावा. ही भरती पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार असून, अर्ज sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळावर स्वीकारले जातील.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची आहेत. sbi.co.in या साईटवर जाऊन अर्ज करता येतील आणि इथेच आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरतीसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आली आहे.
कोणत्याही विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये सरकारी नियमानुसार थोडी शिथिलता देण्यात आली आहे.
दरम्यान, या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना एक परीक्षा द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेत पास झालेले उमेदवारच पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरतील. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला ७५० रूपये फीस ही भरावी लागेल. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना आपल्याला काही कागदपत्रांची पुर्तता कारावी लागणार आहे. ज्यावेळी तुम्ही भरतीसाठी अर्ज करत आहात, त्यावेळी ती कागदपत्रे अपलोड करा.