स्पा सेंटरमध्ये अशीही रासलिला, एका चाळीस वर्षीय महिलेला अटक..!!

नवी मुंबई : वाशी येथील एका प्रसिद्ध मॉलमध्ये सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांना पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका ४० वर्षीय महिलेला अटक केली आहे. वाशीतील मॉलमध्ये असलेल्या स्पामध्ये हा वेश्याव्यवसाय सुरू होता.
पोलिसांनी एका टीप वर ही कारवाई केली आहे. बनावट ग्राहकाला पाठवले होते. तेव्हा स्पा मध्ये गेल्यावर साधारण विशी मध्ये असलेल्या दोन मुलीचे काम करत असल्याचे समोर आले आहे. त्यांना जबरदस्तीने या कामामध्ये आणण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी वेश्याव्यवसायाच्या या काळ्या धंद्याची म्होरक्या असलेल्या एका महिलेला अटक केली आहे. आता पोलीस त्या महिलेची चौकशी करत आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी दोन मुलींची देखील सुटका केली आहे. आता आरोपी महिलेची चौकशी केली जात असून याप्रकरणी अनेक नावे समोर येणाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई टाऊनशिपमधील वाशी भागातील हे प्रकरण उघडकीस आले आहे. जिथे लोकप्रिय मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालतो. पोलिसांकडे वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. याच तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्या स्पा सेंटरवर छापा टाकला आणि वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे.
दरम्यान, बनावट ग्राहकाला स्पा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आणि हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे. सध्या या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहे.