पाकिस्तानातील ‘या’ आजोबांच १०० लग्नाचे टार्गेट ! आत्तापर्यंत तब्बल 26 वेळा लग्न आणि 22 घटस्फोट..!


लाहोर : विविध छंद आणि ध्येयाने पछाडलेले अनेक व्यक्ती आपण बघत असतो, त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर खमंग चर्चा ही होतात. पण पाकिस्तानमधील एका 60 वर्षीय आजोबा विचित्र ध्येयाने पछाडलेले आहेत. त्यांना लग्न करणे, त्या पत्नीपासून मुल जन्माला घालणे आणि त्या पत्नीला घटस्फोट देण्याचा छंद आहे. उर्वरित आयुष्यात या व्यक्तीला 100 लग्न करून सर्वांना घटस्फोट द्यायचा आहे.

पाकिस्तान मधील या 60 वर्षीय व्यक्तीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओत त्याने मुलाखत दिलेली दिसत असून ट्विटरला @activistjyot या हँडलला शेअर करण्यात आले आहे. यामध्ये 60 वर्षीय व्यक्ती आपल्या चार पत्निंसोबत दिसत आहे. त्यांची वये 19 ते 20 वर्ष आहेत. यांच्यापासून मुलं झाल्यानंतर हा व्यक्ती यांनाही घटस्फोट देणार आहे.

सध्या या व्यक्तीची एकूण 22 मुलं आहेत, जी आपल्या आईंसोबत राहतात. घटस्फोटानंतर आपण पत्नीला राहण्यासाठी घर आणि खर्च दिला असल्याचे त्याने सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!