मद्यप्रेमींसाठी खुशखबर! थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत मिळणार दारू, फडणवीस सरकारचा निर्णय..

मुंबई : नवीन वर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवसच उरले आहेत. यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण मोठ्या उत्साहाने तयारी करत आहे. अशातच नवीन वर्ष आणि ख्रिसमस या दोन्ही दिवशी दारू पिणाऱ्यांची संख्या अधिक असते. अशा मद्यप्रेमींना आता सरकारनं खुशखबर दिली आहे.

सध्या भारतासह जगभरात ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सजावटही करण्यात आली आहे. यंदाही दरवर्षीप्रमाणे २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसचा सण जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. दरम्यान, राज्यातील खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रूम आणि ऑर्केस्ट्रा बार पहाटे ५ वाजेपर्यंत खुले ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
ही परवानगी विशेषतः २४, २५ आणि ३१ डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत लागू असेल. इंडियन हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी यांनी १० डिसेंबर २०२४ रोजी शासनाला या संदर्भात विनंती केली होती. या मागणीचा विचार करून शासनाने नाताळ आणि नववर्षाच्या विशेष प्रसंगी लोकांना आनंद साजरा करता यावा यासाठी ही सवलत मंजूर केली आहे.

नवीन वर्ष आणि नाताळ या दोन्ही दिवशी दारू पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याच मद्यप्रेमींसाठी सरकारकडून जयजयकार करण्यास पात्र आहे. नाताळ आणि तेराव्या उपवासाच्या मुहूर्तावर राज्यातील दारूची दुकाने, पब आणि बारच्या वेळा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृह विभागाने यासंदर्भात महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.
गृह विभागाच्या आदेशानुसार दारू दुकानांची वेळ २४ डिसेंबर, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर अशी तीन दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. रात्री १ वाजेपर्यंत दारूची दुकाने सुरू राहणार आहेत. मात्र, पब आणि बारला पहाटे ५ वाजेपर्यंत मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. सरकारी परवानगीनुसार दारू दुकाने सुरू करण्याबाबत राज्य सरकारने परिपत्रक जारी केले आहे.
राज्यातील खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रूम आणि ऑर्केस्ट्रा बार पहाटे ५ वाजेपर्यंत खुले ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी विशेषतः २४, २५ आणि ३१ डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत लागू असेल. प्रशासनाकडून अतिरिक्त पोलिस बंदोबस्ताचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
दरम्यान, ही सवलत मिळाल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वाढीव वेळेमुळे ग्राहकांना त्यांच्या कुटुंबीयांसह किंवा मित्रमंडळीसोबत नाताळ व नववर्षाच्या संध्याकाळी अधिक वेळ घालवता येणार आहे.