सोने खरेदी करायचा विचार करतायं? मग थांबा… जाणून घ्या आजचे नवीन दर

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.

सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. मंगळवारी २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सोनं-चांदीच्या बाजारात हलकी घसरण पाहायला मिळाली. मजबूत अमेरिकन डॉलर आणि जागतिक तणावामुळे सोने-चांदीच्या भावात घट झाली आहे. सामान्य नागरिकांसाठी ही परिस्थिती थोडी दिलासादायक ठरत असली तरी, बाजारातील परिस्थिती लक्षपूर्वक पाहणे गरजेचे आहे.
MCX अर्थात मल्टी कमॉडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया वर सोनं-चांदीच्या भावात मंदी दिसून आली. MCX गोल्ड एप्रिल फ्यूचर्स 0.50% घसरून प्रति 10 ग्रॅमसाठी 1,60,750 रुपये झाले. MCX सिल्व्हर एप्रिल फ्यूचर्स 0.20% घसरून प्रति किलो 2,64,972 रुपये झाले. मागील व्यवहार सत्रात सोन्याचा भाव 3% वाढून 1,61,500 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तर चांदीचा भाव 5% वाढून 2,65,279 रुपये प्रति किलो होता.

दरम्यान, आज २४ फेब्रुवारी रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव 1,190 रुपयांनी घसरून 1,60,920 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर चांदीचा भाव प्रति किलो 1,930 रुपयांनी कमी होऊन 2,64,740 रुपये झाला. या घसरणीमुळे सामान्य खरेदीदारांसाठी किंचित आरामदायक वातावरण तयार झाले.
जागतिक स्तरावर, स्पॉट गोल्ड 1.49% वाढून 5,183 डॉलर प्रति औंसवर व्यापार करत होता, तर स्पॉट सिल्व्हर 3.21% वाढून 87.3 डॉलर प्रति औंस होता. डॉलर निर्देशांक 0.20% वाढून 97.88 वर पोहोचला, ज्यामुळे परदेशी खरेदीदारांसाठी सोनं महाग झाले.