सोने खरेदीचा विचार करताय? आठवड्यात सोनं स्वस्त झालं की महागलं जाणून घ्या…

पुणे : मागील आठवड्यात जागतिक घडामोडींमुळे सोने दरात चढ-उतार झाले. विशेषतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर देशांतर्गत आर्थिक बाजारात हालचाली वाढल्या.

या परिस्थितीत सोन्याचा दर काही वेळा वाढताना, काही वेळा घसरताना दिसून आला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन यांच्याकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशांतर्गत आणि वायदा बाजारात दरांमध्ये फरक पाहायला मिळाला.
२५ जुलै रोजी MCX वर २४ कॅरेट सोन्याचा 3 ऑक्टोबर 2025 च्या वायदा दर 98,748 रुपये प्रति तोळा होता. त्यानंतर आठवड्याभरात हा दर 987 रुपयांनी वाढून 2 ऑगस्ट रोजी 99,375 रुपये झाला. तसेच जून महिन्यात सोन्याचा दर 1 लाखाचा टप्पा पार करून नंतर घसरलेला असतानाही, पुन्हा एकदा किंमतीत वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे.

IBJA च्या वेबसाइटनुसार, देशांतर्गत बाजारात 25 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 98,388 रुपये होता. तो दर 135 रुपयांनी घसरून 2 ऑगस्ट रोजी 98,253 रुपयांवर आला आहे. म्हणजेच वायदा बाजार आणि प्रत्यक्ष देशांतर्गत खरेदी यामध्ये किंमतीचा फरक दिसून येत आहे.
24 कॅरेट – ₹98,253 प्रति तोळा
22 कॅरेट – ₹95,890 प्रति तोळा
20 कॅरेट – ₹87,540 प्रति तोळा
18 कॅरेट – ₹79,580 प्रति तोळा
14 कॅरेट – ₹63,370 प्रति तोळा