कदमवाकवस्तीत चोऱ्यांचे सत्र सुरुच! पुणे पोलिस आयुक्त लक्ष द्या म्हणण्याची वेळ, बंद घरातून पावणेतीन लाखांचा ऐवज चोरीला…


लोणी काळभोर : घरांतील सर्वजण बाहेर गेले असल्याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी सदनिका फोडून त्यामधून रोख रकमेसह सुमारे २ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्या चांदीच्या दागिने चोरुन नेले असल्याची घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत घडली असून सदर प्रकार सोमवार (२२ सप्टेंबर) रोजी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

याप्रकरणी मंगेश तुकाराम मोहिते (वय २९, रा बिल्डींग प्रथमेश अपार्टमेट, फ्लॅट नंबर १०२, पहिला मजला, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहिते हे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त आपल्या कुटुंबासोबत शनिवार (२० सप्टेंबर) रोजी बाहेरगावी गेले होते. सोमवारी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ते घरी आले. तेव्हा त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले.

त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, बेडरुमध्ये असलेल्या लाकडी कपाटाचे कुलूप तोडुन आतील लॉकरचे लॉक तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. कपाटातील १.५ तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्णफुल, ४, ३ व २ ग्रॅम ४० मिलीग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठी, सोन्याच्या ३ नथी, चांदीचा छल्ला, पैजणाची जोड, जोडया, गळ्यातील चांदीची एक चैन, चांदीच्या ३ अंगठ्या याबरोबरच ३० हजार रुपये रोख रक्कम असा चालू बाजारभावाप्रमाणे २ लाख ७५ हजार रुपयांचा किमती ऐवज चोरून नेला.

मंगेश मोहिते यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश पैठणे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!