पुण्यातील चोरट्यांची राज्यात चर्चा!! आधी देवाच्या पाया पडले अन् दानपेटीवर मारला डल्ला, नेमकं काय घडलं?

पुणे : पुण्यात चोरीचा वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी देवाचा आशीर्वाद घेऊन चक्क दानपेटीतूनच पैसे लंपास केल्याची घटना सामोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे या चोरांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पिंपरी- चिंचवडमधली ही घटना आहे. चहोली येथील वरमुखवाडी परिसरात असलेल्या साई मंदिराच्या आवारातील महादेवाच्या मंदिरात ही चोरी झाली. हे चोरटे मंदिरात शिरले महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊन दानपेटीतील पैसे घेऊन पळून गेले. नंतर सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
दानपेटीतून पैसे काढताना तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. सध्या याबाबत पोलीस तपास करत आहेत. हे चोरटे 18 ते 25 वयोगटातील आहेत. मंदिर प्रशासनाच्या वतीने याबाबत दिघी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सीसीटीव्ही बघितले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

देवाला नमस्कार करून केलेली ही चोरी सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. या चोरीचा तपास पिंपरी चिंचवड पोलिस करत असून लवकरच चोरट्यांना बेड्या ठोकल्या जातील, असेही पोलिसांकडून सांगितले जात आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.