पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ ; व्यापारी तरुणावर गोळ्या झाडल्या अन सोनसाखळी घेऊन पसार…

पुणे : पुण्यातील पिंपरी कॅम्प परिसरात व्यापारी तरुणावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.गोळीबार करून आरोपींनी मृत तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली आणि घटनास्थळावरून फरार झाले.सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.

भावेश कंकरानी (वय वर्ष २०) असं मृत व्यापारी तरूणाचं नाव आहे. त्यांच्यावर गोळीबार पिंपरी कॅम्प परिसरात झाला. आरोपी हेल्मेट घालून दुचाकीवरून आले. नंतर त्यांनी आपली दुचाकी कंकरानी यांच्या दुकानासमोर थांबवली. नंतर त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली आणि गोळीबार केला.या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलं. सध्या पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.
दरम्यान त्या तरुणावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या शोध घेण्यासाठी पिंपरी पोलिसांनी दहा पोलिस पथक तयार केली असल्याची माहिती आहे. आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे.
