रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की…,हॉटेलच्या खिडकीचा पडदा राहिला उघडा, जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

राजस्थान : राजस्थानमधील जयपूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पंचतारांकित हॉटेलमधील खोलीत रोमान्स करणार्या जोडप्याचा व्हिडिओ रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
तसेच प्रणयात तल्लीन झालेले हे जोडपे खिडकीतील पडदा टाकायला विसरले, ज्यामुळे त्यांचा खासगी प्रसंग लोकांच्या कॅमेरात कैद झाला आणि त्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला.ही घटना मंगळवारी रात्री साधारणतः १० वाजताची आहे.
जयपूरमधील सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. भारत जोडो पुलावरून नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ सुरू होती. रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांची नजर हॉटेलच्या खिडकीवर पडली. त्यांना जे दिसले, ते पाहून ते अवाक् झाले, कारण हॉटेलमध्ये रोमान्स करत असलेल्या जोडप्याने खिडकी पडद्याने झाकलीच नव्हती.
यामुळे, त्यांचा रोमान्स रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना स्पष्टपणे दिसला. त्यानंतर रस्त्यावर लोकांची गर्दी जमायला सुरुवात झाली. लोकांनी खिशातील आणि हातातील मोबाईल काढून लगेच व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. या प्रकारामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीही झाली होती. या जोडप्याच्या प्रणयाचा संपूर्ण व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला, जिथे तो प्रचंड व्हायरल झाला.
दरम्यानहा व्हिडिओ व्हायरल, झाल्यानंतर हॉटेलच्या व्यवस्थापनाकडे याबद्दल माहिती घेण्यात आली. मात्र, त्यांनी दिलेले उत्तर बुचकळ्यात पाडणारे होते. ज्या खोलीत हे जोडपे रोमान्स करताना दिसत होते, ती खोली हॉटेलची नसल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. परंतु, तोपर्यंत हॉटेलच्या नावासह हा व्हिडिओ सगळीकडे पसरला होता, ज्यामुळे हॉटेलच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.