पत्नीला झोपेच्या गोळ्या देऊन बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, नंतर जे केलं तर वाचून सगळे हादरले, नाशिकमध्ये पती आणि दिराचं नको तेच कृत्य..

नाशिक : पीडितेच्या पतीनेच बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावून तिचे खासगी चित्रीकरण केले आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दिराने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ही घटना नाशिक शहरातील काठेगल्ली परिसरात घडली आहे.याप्रकरणी पती, सासू, सासरे आणि दिराविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचा विवाह झाल्यानंतर काही दिवसांपासूनच सासरच्या मंडळींनी क्षुल्लक कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारहाण करण्यात आली. तसेच तिच्यावर चोरीचा खोटा आळही घेण्यात आला. पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे की, तिच्या पतीने बेडरूममध्ये तिची नजर चुकवून छुपे कॅमेरे बसवले होते.

या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तिचे खासगी फोटो काढण्यात आले. हे फोटो मॉर्फ (छेडछाड) करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी पतीने आणि दिराने दिली. याच फोटोंचा धाक दाखवून दिराने पीडितेवर घटस्फोटासाठी दबाव टाकला आणि तिचा विनयभंग केला.
दरम्यान,सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचाची व्याप्ती इतकी मोठी होती की, पीडितेच्या सासूने तिला जेवणातून गुंगीकारक औषधे किंवा झोपेच्या गोळ्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बेशुद्धावस्थेत असताना पीडितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला.
गुन्हा दाखल..
या छळाला कंटाळून पीडितेने अखेर पोलिसांत धाव घेतली. भद्रकाली पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पतीविरुद्ध लैंगिक छळ, दिराविरुद्ध विनयभंग आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराच्या कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
