Theur : हवेली तालुक्यातील यशवंत कारखान्याच्या निवडणूकीसाठी संस्था प्रतिनिधींचे ठरावासाठी २१ नोंव्हेबर पर्यंत स्विकारणार! गट निहाय सभासद यादी प्रक्रियेस सुरुवात …!
Theur पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ ते २०२८-२९ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदारांची प्राथमिक मतदार यादी बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. Theur
त्यादृष्टिने संस्था सभासदांसाठीचे ठराव २० ऑक्टोंबरपासून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हे ठराव २१ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारले जाणार असल्याची माहिती पुणे प्रादेशिक साखर उपसंचालक आणि कारखान्याच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष संजय गोंदे यांनी दिली.
ज्या संस्था १ ऑक्टोंबर २०२३ रोजी कारखान्याच्या सभासद आहेत, अशा सभासद संस्थांचा समावेश मतदार यादीत होणार आहे. या सर्व संस्था सभासदांनी साखर संकुल येथील पुणे प्रादेशिक साखर उपसंचालक कार्यालयाकडे प्राथमिक मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट
करण्याबाबतचा ठराव करुन प्रतिनिधी नावाचा ठराव कारखान्याच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष यांच्याकडे २१ नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत दाखल करावयाचा आहे. तसेच अर्ज समक्ष आणून दयावेत.
संस्था सभासदांकडून कारखान्याच्या संस्था सभासदांच्या प्रतिनिधीचे नांव दिलेल्या मुदतीत प्राप्त झाल्यानंतर त्या नावाचा समावेश प्राथमिक मतदार यादीमध्ये घेण्यात येईल. तसेच प्राथमिक मतदार यादीच्या हरकती व आक्षेपांबाबत जो कालावधी देण्यात येईल, त्याची स्वतंत्र जाहिरात वृत्तपत्रात देण्यात येईल, असेही गोंदे यांनी सांगितले.
निवडणूक निधीसाठी ४० लाख रुपये जमा
थेऊरचा यशवंत सहकारी साखर कारखाना हा हवेली तालुक्यातील महत्त्वाची संस्था आहे. आर्थिक अडचणीमुळे २०११-१२ पासून हा कारखाना बंद अवस्थेत आहे. कारखान्याचे झालेले अवसायन रद्द करण्यात आल्यानंतर सद्यस्थितीत प्रशासकीय समिती नेमण्यात आली आहे.
कारखान्याचे सुमारे ४०९ संस्था सभासद आहेत. प्रारूप मतदार यादी जाहिर करुन लवकरच एकूण सभासद संख्या अंतिम केली जाणार आहे. तसेच निवडणुकीसाठी सभासद शेतकऱ्यांनी सुमारे ४० लाख रुपये जमा केलेले आहेत. त्यामुळे निवडणुक निधीचा विषय तुर्तास संपुष्टात आलेला आहे.