राष्ट्रवादीचे ‘हे’ तीन बडे नेते आगामी निवडणूक लढवणार नाहीत, कारण…

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बंड करून अजित पवार यांनी स्वतंत्र गट निर्माण केला. शिवसेना भाजप युती सरकारमध्ये अजित पवार यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.
यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीत पडलेल्या या फुटीमुळे पक्षातील काही आमदारांना थेट निर्णय न घेता तटस्थतेची भूमिका घेतली आहे.
ना शरद पवार यांना सोडून जाता येत ना अजित पवार यांना थेट विरोध करता येत त्यामुळे ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी या आमदारांची तसेच काही पदाधिकाऱ्यांची अवस्था झाली आहे.
मात्र, अजित पवार यांची साथ देऊनही एका बड्या नेत्याने थेट निवडणूक लढवणार नाही असे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर आणखी एका आमदार आणि खासदारानेही तशीच भूमिका घेतली आहे.
जुन्नर मतदारसंघाचे आमदार अतुल बेनके, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील त्याचबरोबर खासदार डॉ. अमोल कोल्हे हे तीन नेते निवडणूक लढवणार नसल्याचे समोर आले आहे. या नेत्यांनी यांबद्दल काही वक्तव्ये देखील केली आहे. त्यावरून हे नेते निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.