सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी! १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम.

पुणे : सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एक डिसेंबर २०२५ पासून पाच महत्त्वाचे नियम बदलले जाणार आहे. याच थेट तुमच्या जीवनावर परिणाम होणार आहे.

दरम्यान, या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात नेमके कोणते आर्थिक बदल होतील आणि या बदलाचा सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका परिणाम होणार हे आज आपण जाणून घेऊयात…

हे नियम बदलणार
LPG गॅस सिलेंडरचे दर..

सरकार सहसा एलपीजी गॅसच्या दरात १ डिसेंबरपासून बदल करते. हा बदल व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरबाबत केला जातो. नोव्हेंबर महिन्यात कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर दरात बदल केले होते. १ नोव्हेंबरपासून १९ किलोग्रॅम गॅस सिलेंडरच्या दरात ६.५० रूपयांची घट करण्यात आली होती. अनेक दिवसांपासून घरगुती वापराच्या सिलेंडर दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या महिन्याच्या सुरूवातीला यात बदल होण्याची दाट शक्यता आहे.
UPS डेडलाईन..
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेंशन स्कीम निवडण्याची शेवटची तारीख ही ३० नोव्हेंबर आहे. आधी ही तारीख ३० सप्टेंबर होती. जर एखाद्या कर्मचाऱ्यानं nps आणि ups मधील एका पर्यायाची निवड करायची असेल तर त्याला ही निवड ३० नोव्हेंबर पूर्वी करावी लागणार आहे. १ डिसेंबरपासून या निवडीची संधी मिळणार नाही.
पेंशन, लाईफ सर्टिफिकेट..
ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी लाईफ सर्टिफिकेट जमा करणं गरजेचं असतं. लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची शेवटची तारीख ही ३० नोव्हेंबर आहे. जर एखाद्या व्यक्तीने हे लाईफ सर्टिफिकेट जमा केलं नाही तर त्याची पेन्शन थांबवली जाऊ शकते.
टॅक्स नियम..
जर ऑक्टोबर महिन्यात तुमचा टीडीएस कापला गेला असेल तर सेक्शन 194-IA, 194-IB, 194M आणि 194S नुसार तुम्हाला त्याचे स्टेटमेंट जमा करावं लागणार आहे. याची शेवटची तारीख ही ३० नोव्हेंबर आहेत. त्याचबरोबर ज्या करदात्यांनी सेक्शन 92E अंतर्गत रिपोर्ट जमा करायचा आहे त्यांच्यासाठी देखील ३० नोव्हेंबर ही शेवटची तारीख असणार आहे.
CNG-PNG जेट इंधन..
ऑईल कंपन्या एलपीजी सोबतच सीएनजी आणि पीएनजी तसेच जेट इंधन यांच्या किंमतीत देखील प्रत्येक महिन्याला बदल करतात. नोव्हेंबर महिन्याप्रमाणे डिसेंबर महिन्यात देखील यामध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे.
