पुणेकरांनो लक्ष द्या! ‘या’ ग्राहकांना आता गॅस सिंलिंडर मिळणार नाही, बैठकीत महत्त्वाचा निर्णय, जाणून घ्या काय आहे नवा नियम…


पुणे : तुम्ही जर घरगुती गॅस सिलिंडर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आतापासून (केवायसी) प्रक्रिया पूर्ण नसलेल्या ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे.

दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी आता अनेक ठिकाणी सुरू झाली असून, केवायसी नसल्यास तुमचे गॅस बुकिंग ऑनलाइन स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक आहे.

तसेच केवायसीसोबतच गॅस वितरणाबाबत आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. आता दोन सिलिंडर बुक करण्यामधील कालावधी 21 दिवसांवरून थेट 30 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

म्हणजेच, एकदा सिलिंडर घेतल्यानंतर आता तुम्हाला पुढील बुकिंगसाठी किमान 30 दिवस वाट पाहावी लागणार आहे. या नियमामुळे ग्राहकांच्या प्रतीक्षा कालावधीत आठ दिवसांची वाढ झाली असून, याचा थेट परिणाम गॅसच्या उपलब्धतेवर होणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा साखळीवर मोठा ताण आला आहे. कच्च्या तेलाच्या किमती आणि पुरवठ्यातील अनिश्चिततेमुळे एलपीजी सिलिंडरच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वितरकांनी स्पष्ट केले आहे की, प्रलंबित केवायसी आणि वाढती मागणी यामुळे वितरण व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

नागरिकांनी गॅसचा वापर काटकसरीने करावा आणि आपल्या जवळच्या वितरकाकडे जाऊन तातडीने केवायसी अपडेट करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा, गॅस बुकिंगमध्ये तुम्हालाही मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!