उद्यापासून देशात होणार ‘हे’ मोठे बदल, तुमच्या खिशावर थेट परिणाम, जाणून घ्या…
पुणे : उद्यापासून सप्टेंबर महिना सुरू होत आहे आणि प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्यापासून देखील अनेक बदल होणार आहे. ज्याचा थेट परिणाम तुमच्या स्वयंपाकघरापासून ते शेअर बाजारातील तुमच्या गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर होणार आहे. उद्यापासून देशात काय बदल होणार हे जाणून घेऊया.
सीएनजी-पीएनजी किंमतीत होणार बदल..
एलपीजीच्या किंमतीसोबतच, तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एअर फ्युएलच्या (एटीएफ) किंमतीत बदल करतात, त्यामुळे यावेळेस सप्टेंबरच्या पहिल्या तारखेलाही बदल होऊ शकतात. याशिवाय उद्यापासून देशात सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीतही बदल केला जाऊ शकतो.
एलपीजी सिलिंडरच्या किंमती होणार कमी..
देशातील तेल आणि गॅस वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसच्या किमती बदलतात. अशा स्थितीत १ सप्टेंबरलाही बदल पाहायला मिळू शकतात. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मोठा दिलासा देत केंद्र सरकारने दोन दिवस अगोदर १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात केली आहे.
या क्रेडिट कार्डचे नियम बदलतील..
१ सप्टेंबर २०२३ ॲक्सिस बँकेचे मॅग्नस क्रेडिट कार्ड (ॲक्सिस बँक मॅग्नस क्रेडिट कार्ड) देखील ग्राहकांसाठी खास आहे. वास्तविक, पहिल्या तारखेपासून त्याच्या अटी व शर्तींमध्ये मोठे बदल होऊ शकतात. बँकेच्या वेबसाइटवर शेअर केलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यापासून ग्राहक काही व्यवहारांवर विशेष सवलतीचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
१६ दिवस बँकांना सुट्ट्या..
सप्टेंबर महिन्यात १६ दिवस बँकेला सुट्ट्या असतील. RBI ने बँक सुट्टीची यादी जाहीर केली आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या सण आणि कार्यक्रमांनुसार या बँक सुट्ट्या बदलू शकतात. यामध्ये रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्ट्यांचाही समावेश आहे.
IPO साठी T + 3 नियम लागू..
सेबीच्या म्हणण्यानुसार, पब्लिक इश्यू बंद झाल्यानंतर सिक्युरिटीज (शेअर्स) लिस्ट करण्यासाठी लागणारा वेळ 6 कामकाजाच्या दिवसांवरून तीन कामकाजाच्या दिवसांवर (T+3 दिवस) कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.