लोणी काळभोर, कोलवडी, मार्गे नगरला जाण्यासाठी नवीन दुहेरी रेल्वेमार्ग होणार; कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने केला डीपीआर….

लोणी काळभोर : पुणे शहरातील रेल्वे स्थानकावर येणारा ताण लक्षात घेऊन पुणे ते अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी प्रशासनाने पुणे नगर महामार्गाला समांतर दुहेरी रेल्वे मार्ग तयार करण्याचे नियोजन केले आहे. या नव्या होणाऱ्या रेल्वे मार्गावर लोणी काळभोर, कोलवडी, वाघोलीसह एकूण १२ प्रास्ताविक रेल्वे स्थानके उभारण्यात येणार आहेत.
पुणे ते अहिल्यानगर हा दरम्यान उभारण्यात येणार असलेल्या ९८ किलोमीटरचा हा मार्ग दुहेरी असणार आहे. हा लोहमार्ग पुणे ते अहिल्यानगर या राष्ट्रीय मार्गाला समांतर असुन तो महामार्गाला समांतर रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी डीपीआर तयार केला आहे. याच्या भूमी सर्वेक्षणाचा अंतिम प्रकल्प अहवाल (डीपीआर) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. कंपनीने सादर केला आहे. या दुहेरी मार्गावर १२ रेल्वे स्थानके असणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. हा प्रकल्प मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून हाती घेण्यात आला आहे.
सद्यस्थितीत पुणे स्थानकावरून उत्तर भारतात जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या दौंड रेल्वे स्थानकावरून धावतात. यांमुळे प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय होतो. पुण्याहून बसने नगरला महामार्गावरुन गेले तर तीन ते चार तासांचा कालावधी लागतो. लागतात. प्रस्तावित रेल्वे मार्गावरून गाडी १६० किलोमीटर प्रतितास या वेगाने रेल्वे धावेल. त्यामुळे हे अंतर निम्मे होऊन दीड तासामध्ये नगरला पोहचता येणार आहे. त्यामुळे हा मार्ग प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाबरोबरच रेल्वे मार्ग वाढविण्याचे नियोजन आहे.
तसेच तळेगाव ते उरुळी कांचन आणि पुणे ते अहिल्यानगर अशा दोन नवीन मार्गांवर रेल्वे जाळे विस्तारण्याचे काम रेल्वे बोर्डाकडून हाती घेण्यात येणार आहे. तळेगाव ते उरुळी हा बाह्यवळण मार्ग करण्याचे नियोजन होते, पण आता तो मार्ग दुहेरी करून तोच तिसरी व चौथी मार्गिका असणार आहे. त्याचाही आराखडा कोकण रेल्वेने तयार केला आहे.
पुणे ते अहिल्यानगर दरम्यान ९८ किलोमिटरच्या दुहेरी रेल्वे मार्गासाठी हवेली, शिरूर, पारनेर आणि अहिल्यानगर या चार तालुक्यांतील जमिनीचे भूसंपादन होणार आहे. यासाठी सर्वाधिक जमीन शिरूर तालुक्यातील जाणार असून, त्यांनतर पारनेर आणि अहिल्यानगर तालुक्यातील जमीन जाणार आहे. तर सर्वांधिक कमी जमीन ही हवेली तालुक्यातील जाणार आहे.
या मार्गावर लोणी काळभोर, कोलवडी, वाघोली, वढू, जातेगाव, रांजणगाव एमआयडीसी, कोहकडी, सुपे एमआयडीसी, कामरगाव, चास आणि अहिल्यानगर ही प्रस्तावित स्थानके आहेत. लोणी काळभोर रेल्वे स्थानकावरून एक नवीन मार्गिका तयार होऊन जंक्शन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे लोणी काळभोर परिसराचा मोठा विकास होऊन नागरिकांना रेल्वेचा फायदा होणार आहे.
तालुक्यांमधील एवढी जमीन जाणार (हेक्टर)
हवेली (6.70 कि. मी.),
शिरूर (38.875 कि. मी.),
अहिल्यानगर (53.145 कि. मी.)
एकूण जमीन : 785.898 हेक्टर
जमिनीचा तपशील
– खासगी जमीन – 727.925
– सरकारी जमीन – 13.016
– वनजमीन – 44.956
एकूण जमीन : 785.898 हेक्टर