दिल्लीत रंगली खलबत! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांच्यात तासभर चर्चा, भेटीत नेमकं काय घडलं?


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीत अलबेल असल्याच्या चर्चा सुरू असताना आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रफुल पटेलालंची भेट घेतली. दिल्लीतील या भेटीत तासभर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दिवसभर राष्ट्रवादीतील नाराजीनाट्याची चर्चा रंगली असताना रात्री उशिरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तिथे त्यांनी जेवण केले. जवळपास दीड तास त्या पटेल यांच्या निवासस्थानी होत्या. या भेटीत त्यांच्यात काय चर्चा झाली याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेलांची चर्चा सुरु असताना पार्थ पवारही उपस्थित होते. काल पहाटेपासूनच सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान प्रफुल पटेल उपस्थित नव्हते. यावरुनही चर्चा रंगली होती.तसेच या भेटीत सध्याच्या राष्ट्रवादीतील घडामोडींवरही चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या भेटीचा नेमका तपशील समोर आलेला नाही.

दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर निवडणूक आयोग गेलेल्या पत्रावरून तर्कवितर्क लावले जात असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेले पत्र निरस्त करावे अशी विनंती केली जाणार आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या नाराजीसाठी कारणीभूत ठरलेले ते पत्र आता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!