मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा ‘बंगल्यावर मध्यरात्री खलबत ; शिंदेंकडून 125 जागांची मागणी कशासाठी? जागा वाटपाचा तिढा सुटणार


पुणे :आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी काल रात्री एक बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत भाजपने शिवसेनेला ९० जागांचा प्रस्ताव दिला आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 125 जागांची मागणी केली आहे. या आग्रही भूमिकेमुळे महायुतीत पेच निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी राज्यात महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. तर लगेच १६ जानेवारीला मतमोजणी केली जाणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे.

मुंबईवर आपली पकड मजबूत करण्यासाठी आणि भविष्यात मुंबईच्या महापौरपदावर दावा सांगण्यासाठी शिवसेनेला किमान १२५ जागा लढवणे गरजेचे वाटत आहे. शिंदेंच्या या आक्रमक खेळीमुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. शिवसेनेच्या मते, ६० जागांवर त्यांचे निर्विवाद वर्चस्व आहे, तर इतर जागांवरही पक्षाची ताकद वाढली आहे.एकनाथ शिंदे हे १२५ जागांसाठी आग्रही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान वर्षावरील दोन तासांच्या खलबतांनंतर आज सकाळी ११ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी शिवसेना कोअर कमिटीची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत १२५ जागांच्या मागणीवर शिक्कामोर्तब करून त्यांनी भाजपला स्पष्ट निरोप दिला आहे. त्यामुळे महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटणार कां हें पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!