भारतात मार्ग निघेना, आता थेट परदेशातून येणार मदत, अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी मोठी माहिती आली समोर…


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील विमान अपघातानंतर अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत. तसेच आता अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये झालेल्या अपघाताच्या चौकशीने आता वेग घेतला आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो मार्फत या प्रकरणाचा काटेकोर तपास सुरू आहे.

या विमानातील महत्त्वाचे तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आता अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या विमानाच्या डिजीटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरचे नुकसान झाले आहे. आता याचे नुकसान झाल्याने रेकॉर्डर बनवणाऱ्या कंपनीकडून तांत्रिक मदत घेतली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांना विमानाच्या डिजीटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर मधील माहिती यशस्वीरीत्या डाऊनलोड करण्यात यश आले आहे. यातून विमानाचा वेग, उंची आणि तांत्रिक स्थितीची अचूक माहिती मिळणार आहे.

मात्र, कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर बाबत मोठी अडचण निर्माण झाली आहे. अपघाताच्या वेळी निर्माण झालेल्या उच्च तापमानामुळे या रेकॉर्डरचे गंभीर नुकसान झाले आहे. त्यातील वैमानिकांचे शेवटच्या क्षणाचे संभाषण मिळवणे कठीण झाले आहे.

दरम्यान, CVR मधील महत्त्वपूर्ण संवाद रिकव्हर करण्यासाठी आता हा रेकॉर्डर बनवणाऱ्या मूळ कंपनीची तांत्रिक मदत घेतली जात आहे. हा रेकॉर्डर दुरुस्तीसाठी आणि त्यातील डेटा मिळवण्यासाठी परदेशातील तज्ज्ञांकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे या संवादातून अपघाताचे नेमके कारण आणि तांत्रिक बिघाड स्पष्ट होण्यास मदत होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

तर दुसरीकडे, नागरी उड्डाण महासंचालनालयाने संबंधित VSR कंपनीच्या सुरक्षा प्रणालीची आणि कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू केली आहे. विमान उड्डाणापूर्वी सर्व सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का आणि विमानाची देखभाल योग्य प्रकारे केली होती का, याची पडताळणी केली जात आहे.

आता याप्रकरणी नागरी उड्डाण मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. ही तपास प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. चौकशीचा अधिकृत अहवाल आल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे आवाहन नागरी उड्डाण मंत्रालयाने केले आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!