कर्जमाफीसाठी पैसे नाहीत अन् हवाई खर्चासाठी 143 कोटींची तरतूद, सरकारच नेमकं चाललंय काय?

मुंबई : एकीकडं २०१७ च्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, कृषी समृद्धी योजना, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत यासाठी निधी नाही. मात्र दुसरीकडं #VVIP लोकांच्या हवाई प्रवासासाठी तब्बल १४३ कोटींची तरतूद करून सरकारने आमची प्राथमिकता शेतकरी नसून मौजमजा आणि उधळपट्टी आहे, हेच सिद्ध केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी अडचणी आला असून कर्जमाफीची मागणी सातत्याने केली जात आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरी देखील योग्य वेळ आल्यावर निर्णय घेऊ अस सांगितले जात आहे. यामुळे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, राज्यात दररोज सरासरी ८ शेतकरी आत्महत्या होत आहेत, मनरेगाची बिलं थकल्याने शेतकऱ्यांना सावकाराकडून पैसे घ्यावे लागतायेत.
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या रखडल्या आहेत, बिलं रखडल्याने युवा कंत्राटदारांना आत्महत्या कराव्या लागतायेत, सारथी, बार्टी, महाज्योती सारख्या संस्थांना पुरेसा निधी नाही. अशा परिस्थितीत सरकारच्या पुरवणी मागण्या बघता सरकारला सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काहीही देणंघेणं नसल्यासारखंच सत्ताधारी वागत आहेत.

अनेक कामे देखील निधीमुळे रखडली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र दुसरीकडे उधळपट्टी केली जात आहे. सरकारी यंत्रणा आणि जनतेचा पैसा फुकट मिळाल्यासारखं ओरबाडण्यापेक्षा सत्तेतील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. असेही आमदार रोहित पवार यांनी सांगितले आहे. यामुळे वातावरण तापले आहे.

दरम्यान, सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी नेत्यांवर विरोधक टीका करत असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. सध्या शेतकरी खरच मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे. सरकार फक्त कर्जमाफी करू म्हणत वेळ मारून नेत आहे
