कांद्याला बाजार नाही, खर्च केलेले पैसे निघत नसल्याने शेतकऱ्याने कांदा पेटवला


धुळे : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच धुळे जिल्ह्यातील अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे.

प्रचंड मेहनतीने पिकवलेल्या कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.शेतकऱ्यांवर कांदे फेकून देण्याचे वेळ आली.धुळे जिल्हा कांदा उत्पादनासाठी अग्रेसर मानला जातो.

धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेला कांदा भुई सपाट करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दर न मिळाल्यामुळे कांद्याचा वापर शेतकरी खत बनवण्यासाठी करत आहे.

या पावसामुळे आंबा पिकाचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव आणि कोरेगाव तालुक्यात विजेच्या गडगडासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वादळ वाऱ्यामध्ये प्रचंड मोठ मोठी झाडे उकळून पडली.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!