राज्यात लॉकडाऊन अजिबात नाही,अफवा फसवणाऱ्यांवर कारवाई..; मुख्यमंत्री फडणवीसांकडून बैठकीबाबत मोठी अपडेट

पुणे : गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या इराण – इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली याची माहिती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.जे इंधन तुटवड्याची किंवा लॉकडाऊची अफवा पसरवतील त्यांच्यावर कडक कारवाई करू असा इशाराही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

आखाती युद्धामुळे इंधन, एलपीजी आणि लॉकडाऊन बाबत भारतीय नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या युद्धाचा मोठा परिणाम हा इंधन पुरवठ्यावर होताना दिसत आहे. याचा काही प्रमाणात भारताला देखील फटका बसला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती.
बैठकीत झालेल्या चर्चेवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सध्या जगभरात मोठं संकट आहे, या संकटाच्या काळात मोदी हे ज्या पद्धतीनं देशाचं नेतृत्व करत आहेत, त्याचं कौतुक सर्वच मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये केलं. आज आपल्या शेजारच्या अनेक देशांमध्ये आणि काही विकसीत देशांमध्ये देखील इंधन संकटामुळे काम बंद ठेवण्याची वेळ आली आहे, काही देशांनी 4 दिवसांचा आठवडा केला आहे. काही जणांनी वर्क फॉर्म होमचा पर्याय निवडला. अशा स्थितीमध्ये मोदी यांनी या परिस्थितीला ज्या पद्धतीने सांभाळं त्यामुळे आपल्याला या संकटाचा फटका बसला नाही, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

जाणीवपूर्वक देशातील काही लोक अफवा पसरवत आहेत. देशात लॉकडाऊनची अफवा पसरवणाऱ्या देशद्रोहावर कडक कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं. तसेच आपल्याला पुरवठ्याचा कमीत कमी त्रास होत आहे. पेट्रोल डिझेल सातत्याने मिळत आहे घरगुती गॅस सर्वाना मिळत आहे.पंतप्रधान मोदींनी अत्यंत चांगल्या प्रकारे हे संकट हाताळल आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तसेच आपल्याला सरकारने पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्यात कोणतीही कमतरता होऊ दिली नाही. वाढलेल्या किमतीचा फटका सरकारने सहन केला असून ग्राहकावर टाकलेला नाही. जे लोक राज्यांमध्ये अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असंही मोदी यांनी यावेळी म्हटलं. देशात इंधनाचा तुटवडा नाही, पुढे जी परिस्थिती निर्माण होईल, त्यासाठी देखील स्टॅटजी तयार आहे. असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.