दिल्लीत खलबतं! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यान शरद पवार गटाला धडकी; पक्ष फुटणार?

मुंबई : गेल्या दोन-तीन वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 2022 मध्ये झालेल्या शिवसेनेतील मोठ्या बंडानंतर आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आता पुन्हा एकदा मोठा पक्ष फुटण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तूर्तास ‘ऑपरेशन टायगर’ऐवजी ‘ऑपरेशन तुतारी’ सुरू केले असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपासून ते ऑपरेशन टायगर-तुतारीची चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.शरद पवार आपल्या खासदारांना वाचवण्यात यशस्वी होतात की पुन्हा एकदा राज्यात मोठी फोडाफोडी पाहायला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची तातडीने बैठक बोलावली होती.त्यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, आमच्या पक्षात खासदारांची मने जाणून घेण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी अद्याप अशा प्रकारची कोणतीही यंत्रणा राबवण्यात आली नसल्याचे खंत या राष्ट्रवादीच्या नेत्याने व्यक्त केली.

दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीच्या या दोन मोठ्या धक्क्यांमुळे राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले होते. आता तोच पॅटर्न पुन्हा राबवला जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.