शिक्षण विभागात खळबळ! पुण्यात १८ पालकांवर गुन्हा दाखल, शिक्षण विभागाची कारवाई, नेमकं घडलंय काय


पुणे : शिक्षण विभागाकडून १८ पालकांवर कारवाई करण्यात आली आहे. RTE हा शिक्षणाचा हक्क कायदा आहे. या कायद्यांतर्गत पाल्याला शाळेत प्रवेश घेता येतो. यामध्ये खोटी माहिती दिल्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत माताळवाडी भुगाव येथे घडला होता. आरोपी पालकांनी त्यांच्या पाल्यांना आरटीई मधील प्रवेश घेण्यासाठी खोटा रहिवासी पुरावा सादर केल्याची माहिती समोर आली आहे.

शिक्षण विभागाने केलेल्या छाननीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवर खोटी माहिती दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

दरम्यान, RTE म्हणजे शिक्षणाचा अधिकार कायदा आहे. हा कायदा ४ ऑगस्ट २००९ रोजी भारतीय संसदेने पारित केला होता. हा कायदा, बालकांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण मिळण्याची हमी दिली जाते. या अंतर्गत अनेक मान्यवर आणि मोठ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जाते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!