‘या’ लाडक्या बहिणींच्या बँकेत थेट ३००० रुपये जमा होण्याची शक्यता, तुम्हाला मिळणार का?, जाणून घ्या संपूर्ण माहिती..


पुणे : राज्य सरकारनं ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. राज्य सरकारची ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात.

गरीब कुटुंबातील महिलांना आर्थसाह्य व्हाव हा या योजनेचा उद्देश आहे. अशातच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांसाठी मोठी बातमी आहे. काही महिलांच्या बँक खात्यावर लवकरच थेट ३००० रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे ज्या महिलांना मागील हप्त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांना आता एकत्रित रक्कम मिळण्याची आशा आहे. दरम्यान, या योजनेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करून दिले जातात. ही योजना महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून गरजू, गरीब, घटस्फोटित आणि विधवा महिलांना आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून या योजनेत नियमित हप्त्यांच्या वितरणात अडचणी आल्या आहेत. तसेच मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये मिळाला. दरम्यान, जूनचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आला.

मात्र अनेक महिलांना जून महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक महिलांना वाटत आहे की, त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आले आहे का? या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे की, काही महिलांना तांत्रिक कारणामुळे हप्ता वेळेवर मिळू शकलेला नाही. त्यामुळे ज्या लाभार्थींना जूनचा हप्ता मिळालेला नाही, त्यांना जून व जुलै या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळून ३००० रुपये जमा होऊ शकतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!