सगळीकडे गॅस टंचाई पण शेगावचे गजानन महाराज संस्थान दररोज 50 हजार भाविकांचा महाप्रसाद बनवतंय, कसं होतंय शक्य?


शेगाव : सध्या मध्य पूर्वेत इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायलने पुकारलेल्या युद्धामुळे देशात गॅस टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. इराणने आखाती देशातील तेल प्रकल्पांवर हल्ले केले. त्यामुळे काही देशांनी तेल उत्पादन करणाऱ्या रिफायनरीज बंद केल्या. त्यानंतर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुजचा मार्ग बंद केला. गॅससाठी देश अनेक ठिकाणी लाइनमध्ये उभा आहे.

या युद्धामुळे तेल आणि गॅस घेऊन भारताच्या दिशेने येणारी अनेक जहाजं स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये अडकली आहेत. परिणामी भारतात एलपीजी गॅसचं संकट गंभीर होत चाललं आहे. देशात अनेक भागात गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर सिलिंडर मिळवण्यासाठी रांगा लागल्याचं चित्र आहे. सगळीकडेच ही गॅस टंचाई जाणवत असताना शेगावचं संत गजानन महाराज संस्थान मात्र गॅसच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे.

राज्यात अनेक मंदिरांच्या संस्थांनी प्रसादाच्या बाबतीत कपात केली आहे. पण बुलढाण्याच्या शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानमध्ये मात्र, दररोज 50 हजार भाविकांसाठी महाप्रसाद बनत आहे. मुख्य म्हणजे यात गॅस टंचाईचा कुठलाही अडथळा नाही. अनेकांना प्रश्न पडलाय हे कसं शक्य आहे. मात्र त्यांनी नियोजन लावले आहे.

विनाअडथळा दररोज 50 हजार भाविकांसाठी महाप्रसाद बनवणं संस्थानला शक्य होत आहे. गजानन महाराज संस्थानचं केंद्रीय भंडार गृह आहे आणि अन्नपूर्णा अक्षय पात्र पाकशाळा आहे. गजानन महाराज संस्थानकडून सौर ऊर्जेचा वापर केला जातो. तसेच एकविरा देवी संस्थेच्या महाप्रसादाच्या अन्नछत्रावरही आखाती देशातील युद्धाचा परिणाम झाला आहे.

एकविरा संस्थानकडून भाविकांसाठी महाप्रसाद सुरू आहे. पण पदार्थांमध्ये मोठी कपात. पूर्वी भाविकांना वरण,भात ,भाजी पोळी ,कळी सोबतच एक गोड पदार्थ दिला जात होता. मात्र आता सिलेंडर अभावी फक्त खिचडी, पिठलं आणि एक गोड पदार्थ दिला जातो. साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईच्या झळा जाणवतायत. साईभक्तांना आजपासून प्रसाद पाकीटातून एकच लाडू मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!