तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण, दरवाजा उघडताच….,पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल

राजस्थान : पैशांच्या लोभापायी नात्यांमधील विश्वास आणि माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील बाडमेर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कोणीही कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवताना दहा वेळा विचार करेल.
एका तरुणीच्या वडिलांनी आणि चुलत भावाने तिच्या मोबाईल नंबरवरून मेसेज पाठवून एका ओळखीच्या तरुणाला जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याला तीन दिवस ओलीस ठेवून मारहाण करत पैशांची मागणी केली. सदारची घटना बाडमेरच्या शिवनगर परिसरातील आहे.
पोलिसांनी कट रचणाऱ्या काका-पुतण्याला अटक केली असून, एक आरोपी अजूनही फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जूनच्या रात्री एक २४ वर्षीय तरुण आपल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. त्याचवेळी त्याला व्हॉट्सॲपवर एका ओळखीच्या तरुणीचा मेसेज आला.\
मेसेजमध्ये तरुणीने या तरुणाला भेटायला बोलावले होते. या तरुणाला शिवनगरमधील एका हॉटेल रूमवर बोलावण्यात आले होते. तरुण त्या तरुणीला आधीपासून ओळखत असल्याने त्याला कोणताही संशय आला नाही. तो तरुणीने दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. मात्र, जसा तो रूममध्ये शिरला, तसा त्याला धक्काच बसला. तिथे ती तरुणी नव्हे, तर तिचे वडील, तिचा चुलत भाऊ आणि आणखी एक तरुण त्याची वाट पाहत होते.
तिघांनी मिळून त्या तरुणाला पकडले आणि त्याच्यावर अमानुष अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्याला ओलीस ठेवून मारहाण देखील केली. त्यानंतर खोट्या बलात्कार प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. इतकेच नाही तर, आरोपींनी तरुणाचे कपडे काढून त्याचे नग्न फोटो आणि व्हिडीओ बनवले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत, २० लाख रुपयांची खंडणी मागितली.
दरम्यान, तरुणाने आपल्याकडे इतके पैसे नसल्याचे सांगत आरोपींकडे विनवणी केली. त्यानंतर आरोपींनी रक्कम कमी करून, पाच लाख रुपयांची मागणी केली. या तरुणाने कसाबसा आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी ५० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली, परंतु आरोपी पाच लाखांवर ठाम राहिले. अखेर पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी तरुणाचे लोकेशन ट्रेस करत त्याला शिवनगरमधून सोडवले, परंतु तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. त्यानंतर बाडमेर पोलिसांनी या काका-पुतण्याला त्यांच्या गावातून अटक केली आहे. सध्या पोलीस तिसऱ्या आरोपीच्या शोधात आहेत.