तरुण बुडत होता अन् मित्र गाणी ऐकत होते! पुण्यातील मन हेलावणारी घटना, पानशेत धरणात नेमकं घडलं काय?


पुणे : पुण्याच्या खडकवासला आणि पानशेत धरण परिसरात देखील पर्यटकांचा ओढ वाढला आहे. दरम्यान, पानशेत धरण परिसरात फिरायला गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

मोहनीस विजय बोलाटे असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. तो पुण्यातील येरवडा परिसरातील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी रविवारी सुट्टी असल्याने मयत मोहनीस आपला भाऊ शुभम आणि इतर काही मित्रांसह पानशेत धरण परिसरात फिरायला गेला होता.

यावेळी सर्वजण पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उतरून पर्यटनाचा आनंद घेत होते. मात्र त्यांचा हा आनंद क्षणात विरला. पाण्याचा आनंद घेत असताना मोहनीस याचा बुडून मृत्यू झाला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी मयत मोहनीस त्याचा भाऊ शुभमसह त्याच्या काही मित्रांसोबत पानशेत धरण परिसरात फिरायला गेला होता. या वेळई सर्वजण पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्र परिसरात उतरले. यावेळी काहीजण धरणाच्या कडेला बसून गाणी ऐकत आणि गप्पा मारत होते. यावेळी मयत मोहनीस आणि त्याचा मित्र ज्ञानेश्वर सोनटक्के यांनी पोहण्यासाठी पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला.

दोघंही धरणात उतरून पोहण्याचा आंनद घेऊ लागले. दुसरीकडे, त्यांचे सर्व मित्र धरणाच्या काठावर बसून गाणी ऐकण्यात आणि गप्पा मारण्यात दंग झाले. यावेळी अचानक मोहनीस दिसेनासा झाला. ही बाब ज्ञानेश्वरच्या लक्षात आल्यानंतर त्याने आरडाओरडा सुरू केला. पण तोपर्यंत फार उशीर झाला.

मोहनीस कुठेच दिसून आला नाही. मोहनीस पाण्यात बुडाल्याचं समजताच मोहनीसचा भाऊ शुभमसह मित्रांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने खोल पाण्यात मोहनीसचा शोध घेतला.

दरम्यान, दीड तासांच्या बचाव कार्यानंतर पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी तातडीने मोहनीसला वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मोहनीसला मयत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!