रिव्हरव्ह्यू सिटी”च्या पाईपलाईनचे काम त्वरित बंद करावे; ‘एनएचएआय’चे सहाय्यक कार्यकारी अभियंता पंकज प्रसाद यांचे आदेश….


लोणी काळभोर : गेल्या दहा दिवसांपूर्वी रिव्हरव्ह्यू सिटीने पाण्याची पाईप लाईन नेताना दुभाजकापासून १५ मीटर अंतर सोडून परवानगी असतानाही पुणे सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यात खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन तरुण जखमी झाले होते. यावेळी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणतीही उपाययोजना केली नसल्याने न नेल्याने अपघातास कारणीभूत ठरण्याप्रकारणी ठेकेदारसह कर्मचाऱ्यांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे (पुणे) सहाय्यक कार्यकारी अभियंता पंकज प्रसाद यांनी हे काम त्वरित बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

पंकज प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार बहुचर्चित रिव्हरव्ह्यू सिटीने पाईललाईन खोदण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची परवानगी घेतलेली आहे. सदर पाईपलाईन नेण्यासाठी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या रस्ता दुभाजकापासून १५ मीटर अंतर सोडून परवानगी देण्यात आली आहे. परंतु या परवानगीला वाटाण्याच्या अक्षता लाऊन रिव्हरव्ह्यू सिटीने बेकायदेशीररित्या सेवा रस्ता खोदून काम सुरु केले आहे. त्यामुळे त्यांचे काम त्वरित बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

खोदलेल्या सेवा रस्त्यावरून जात असताना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत वेदांत सावंत आणि आदित्य सुरेश आटोळे हे दोघे दुचाकीसह १५ ते २० फुट खड्ड्यात पडले होते. या अपघातात आदित्य हा गंभीर जखमी झाला असून तो कायमचा अपंग झाला असल्याची माहिती समोर येत आहे. यांमुळे अनधिकृत काम करणाऱ्या रिव्हरव्ह्यू सिटीच्या संचालक व ठेकेदरांवर काय कारवाई होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पाईललाईनला परवानगी दिली आहे. पण एनएचएआय ने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे हस्तांतरित केला असल्याचा गैरफायदा उठवत रिव्हरव्ह्यू सिटीने महामार्गावरच्या सेवा रस्ता बेकायदेशीररित्या खोदून पाईपलाईन नेली आहे. मात्र यामध्ये खोदलेल्या खड्ड्यात पडून अपघात झाला होता. त्यामुळे रिव्हरव्ह्यू सिटीवर कारवाई कोण करणार? या घटनेबाबत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ पुणे व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे पुणे यांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांवर टोलवाटोलवी केली होती. परंतु, आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे हे काम बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

रिव्हरव्ह्यू सिटीकडे जाणारी पाईपलाईन ही शिवरस्त्याने नेणे म्हणजे सर्वोत्तम पर्याय आहे. परंतु रिव्हरव्ह्यू सिटीचे संचालक हे मनगटशाहीच्या जोरावर सेवा रस्त्यातून घेऊन जात आहेत. त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे काहीच देणेघेणे नाही. पाईपलाईन नेण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध असताना केवळ नागरिकांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. आज अखेर विरुद्ध दिशेने गाड्या येत आहेत. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार रिव्हरव्ह्यू सिटीचे संचालक आहेत.त्यांच्या निष्काळजीपणामुळे आदित्य आटोळे याला कायमस्वरूपीची गंभीर इजा झालेली आहे. संचालक मंडळांनी त्याला आयुष्यभर पुरेल एवढी मदत करणे गरजेचे आहे. झालेल्या अपघाताला सर्वस्वी रिव्हरव्ह्यू सिटी जबाबदार आहे. यापुढील काळात या पाईपलाईनचे काम असेच अनधिकृतपणे सुरू राहिले तर उपोषण आणि ठिय्या आंदोलन करण्यासाठीही मागेपुढे पाहणार नाही.

-चित्तरंजन गायकवाड (माजी सरपंच कदमवाकवस्ती)

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!