प्रतीक्षा संपली! शेतकरी किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याची अपडेट समोर…

पुणे: गेल्या काही दिवसांपासून शेतकरी किसान योजनेचा 21 वा हप्ता कधी येणार? अशी चर्चा सुरू आहे. या महिन्यात बिहार निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच सन्माननिधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतातील शेतकऱ्यांच्या खात्यात एक महिन्यापूर्वीच केंद्र सरकारने 21 वा हप्ता जमा केला आहे. तिथल्या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी त्यावेळी मदत करण्यात आली आहे. पी एम किसान योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळतो. या योजनेतंर्गत वर्षभरात शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची मदत करण्यात येत आहे. 2-2-2 रुपयांप्रमाणे ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. केंद्र सरकारने 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 वा हप्ता जमा केला आहे. या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट बँक खात्यात जमा केली आहे.
दरम्यान आता शेतकरी किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता कधी मिळणार याची शेतकऱ्यांमध्ये प्रतिक्षा असताना आता बिहार निवडणुकीच्या आधीच हा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.. या महिन्यात बिहार निवडणुकासाठी दोन टप्प्यात मतदान होत आहे. त्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात DBT अंतर्गत थेट पैसा जमा होणार आहे.
