शिरूर येथील शेतकऱ्याच्या मुलाचा नादच खुळा! पहिल्यांदा नायब तहसीलदार आता थेट मुख्याधिकारीपदी नियुक्ती
शिरूर : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील शेतकऱ्याच्या मुलाने उज्ज्वल यश मिळवले आहे. त्यांची नगरपालिका मुख्याधिकारी पदावर निवड झाली आहे. यामुळे त्याचे कौतुक होत आहे.
अभिनेत्री मानसी नाईकचा घटस्फोट, म्हणाली त्याने स्वतःच्या सोईनुसार वापरलं
मांडवगण फराटा येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या निखिल लक्ष्मण फराटे यांनी शिक्षणानंतर नोकरी केली. त्यानंतर नोकरी करत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पाचव्या प्रयत्नात त्यांना यश येत राज्यसेवा २०२० च्या परीक्षेत त्यांची २०२२ मध्ये नायब तहसीलदार पदावर निवड झाली.
शिक्षण फक्त 10 वी, पण केरला स्टोरीसाठी अदाने किती रक्कम घेतलीय माहितेय का? जाणून घ्या
या मिळालेल्या पदावर समाधान न मानता त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली.नायब तहसिलदार पदावर प्रशिक्षण सुरू असताना दररोज सकाळी व संध्याकाळी प्रशिक्षण सांभाळून अभ्यास केला. राज्यसेवा परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात त्यांनी यश मिळवले असून त्यांची नगरपालिका मुख्याधिकारी पदावर निवड झाली आहे.
लोणी काळभोर येथील एका २० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण..
या यशाबद्दल बोलताना निखिल यांनी सांगितले की, राज्य लोकसेवा आयोगाच्या २०२० च्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर नायब तहसिलदार पदावर निवड झाली होती. मात्र ध्येय मोठे होते. त्यामुळे पुन्हा अभ्यास सुरू ठेवला. अभ्यास व प्रशिक्षण असे दोन्ही सुरू असताना तारेवरची कसरत होती, मात्र कुटुंबाने मोठी साथ दिली. पत्नी, वडील, चुलते, भाऊ यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यामुळे यश मिळवता आले आहे.