पुण्यातील लॉजवर दोघे गेले, पण येताना ती एकटीच बाहेर आली, रूममध्ये घडलं धक्कादायक…

पुणे : पुण्यातील नवले ब्रीज परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका लॉजमध्ये प्रेयसीसोबत गेलेल्या तरुणाचा भयावह शेवट झाला आहे. लॉजवर जाताना दोघेजण होते. दोघंही सहमतीने या लॉजवर आले होते.
मात्रा जाताना फक्त एकटीच महिला बाहेर पडली. तरुणाचा लॉजवरच भयावह अंत झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
कार्तिक बाबू शेट्टीयार असं मयत पावलेल्या ३४ वर्षीय तरुणाचं नाव आहे.
तो कात्रजच्या संतोषनगर परिसरात वास्तव्याला होता. तो जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचा. 30 एप्रिल रोजी तो आपल्या प्रेयसीसोबत नवले ब्रीज परिसरातील एका लॉजवर गेला होता. याठिकाणी त्याचा प्रेयसीसोबत वाद झाला.
हा वाद टोकाला गेल्यानंतर त्याने तरुणीच्या ओढणीनेच आयुष्याचा शेवट केला आहे. या प्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मयताच्या प्रेयसीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कार्तिकचा भाऊ तंगराज बाबू शेट्टीयार (३८) याने दिलेली फिर्याद आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. तर आरोपी तरुणी नृत्याचे कार्यक्रम करायची. काही काळापूर्वी दोघांमध्ये मैत्री झाली होती. ३० एप्रिल रोजी दोघे नवले पुलाजवळील एका लॉजमध्ये गेले होते.
दोघांमध्ये वाद झाल्यावर कार्तिकने ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपी तरुणी कार्तिकचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होती. यातूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.
कार्तिकच्या सांगण्यावरून त्याच्या मित्रांनी आरोपी तरुणीला घर घेण्यासाठी जवळपास २० लाख रुपये दिले होते. याबाबत ते कार्तिककडे विचारणा करत होते. पण तरुणी पैसे रिटर्न देत नव्हती. पैसे घेऊन तरुणी त्रास देत आहे.
दरम्यान, तिच्या त्रासामुळे आत्महत्या करावे लागेल, असं कार्तिकने तंगराजला सांगितले होते. कार्तिकच्या आत्महत्येस तरुणी जबाबदार असल्याचा तंगराजांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.