हवेलीत देवदर्शनाचा ट्रेंड मतदारांच्याच येतोय मुळाशी! ट्राफिक जाम, बत्ती गुल हे साधे प्रश्न झाले गंभीर; सहलीचा ट्रेंड समस्येतून हौंसच फेडतोय….

जयदिप जाधव

उरुळीकांचन : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हवेली तालुक्यात मतदारांना खूश करण्यासाठी राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी सहली ,पर्यटनवारी , लक्ष्मीदर्शन तसेच जेवणावळीचा नवीन ट्रेंड सुरू केल्याने नागरीकांना भेडसावणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी कोन वारी उरला का ?असा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ते तुंबले, वीज गायब झाली, रस्ते उखडले, सिंचनाचा बट्ट्याबोळ, प्रवासी सेवेचा खोळंबा तसेच सरकारी कार्यालयांत हेलपाटे हे प्रश्न सामान्यांच्या मानगुटीवर मतदारांनीच बसवून घेतले असून देवदर्शन व पर्यटनवारीत गुंग झालेल्या मतदारांना हे प्रश्न सोडविण्यासाठी मदतीचे हात कमी पडू लागले असून मतदार प्रलोभनातून स्वतः च्या पायावर धोंडा मारुन अवदसा ओढून घेत असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

हवेली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना या निवडणुकांचे इच्छुक मतदारांना खुश करण्यासाठी नवीन क्लुप्त्या आखत आहे. या क्लुप्त्यांवर देवदर्शन यात्रा हा सर्वाधिक प्रभावी ट्रेंडसुरू झाला असून या ट्रेंडमधून मतदारांची खत्रीशीर भावनिक किनार तयार होऊन श्रेध्देतून आकर्षित करण्याचा प्रभावी योजना तयार झाली आहे. या सर्व तयारीच्या गर्दीत मात्र मतदारांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी चालू धामधुमीत सुरू झालेले हे दातृत्व कमी पडू लागले असून मतदारांच्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी कोन वारीच उरले नसल्याची ओरड सुरू झाली आहे.

हवेली तालुका शहराजवळील भाग असला तरी या भागात नागरी समस्येची ओरड मोठी आहे. या ठिकाणी ‘रोग भयंकर पण इलाज नाही’ अशा आवस्थेत वर्षोनुवर्षे काही समस्या सुटत नाही अशाआवस्थेत नागरीक या समस्यांचे निराकरण व्हावे अशा प्रतिक्षेत आहे. मात्र या समस्यांना सोडविण्यासाठी वालीच उरला नाही ? अशा आवस्थेत आहे. हवेली तालुक्यात मोठा प्रश्न असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक कोंडी,वीजेची समस्या, उखडलेले रस्ते,सिंचनासाठी आवर्तनाचा खोळंबा,सरकारी प्रवासी वाहनांची गैरसोय तसेच वैयक्तिक कामांसाठी सरकारी कार्यालयांत ससेहोलपट हे प्रश्न सोडविण्यासाठी गाव गाड्यातील नेतेमंडळींच फारसे स्वारस्य दाखवित नसल्याने या बदलत्या लोकसेवकांची व्याख्या नागरीकांच्या मुळावर उठू लागली असून ‘भिक नको पण कुत्रे आवर’ आवस्था नागरीकांनाच पचणी पाडून घ्यावी लागत आहे.
नेतेमंडळी, कार्यकर्ते संकल्पनाच संपली…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा हा नवीन ड्रेंड हा सर्वाधिक नागरीकांना धोकादायक बनला आहे.यानिवडणूकीत इच्छुकांनी स्थानिक नेतेमंडळी,कार्यकर्तेयांच्या वीना मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. सहलीवारी,देवदर्शनाने इच्छुकांनी स्थानिक नेते मंडळी ,कार्यकर्ते यांंना बाजूला सारुन निवडणुकीचे नियोजन आखले आहे. इच्छुक निवडणूक मँनेजमेंट पथकाकडून थेट मतदारांशी संवाद साधत असल्याने स्थानिक राजकारणातही नेतेमंडळी व कार्यकर्ते ही संकल्पनाच संपणार आहे.
आंदोलनाला नेतेमंडळींची आनास्था!
नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी व शासन दरबारी आवाज उठविण्यासाठी आंदोलन हा लोकशाहीने दिलेला मार्ग आहे. मात्र हवेली तालुक्यात शेतकऱ्यांशी निगडीत मूलभूत प्रश्न आहे.पाणी ,शेतमालाचे भाव तसेच स्थानिक जनतेच्या समस्या सोडविण्यास नेतेमंडळींत अनास्था उरली का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
