पिपंरीतील फॉर्च्युनर हत्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडले; 4 जण कटात सहभागी, कारणही झालं स्पष्ट


पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारी घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दोन दिवसांपूर्वीच पिंपरीमध्ये नितीन गिलबिले यांची फॉर्च्युनर कारमध्ये हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली होती. या हत्या प्रकरणातील धागेदोरे उलगडले असून या प्रकरणात आणखी दोघांचा सहभाग असुन एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नितीन गिलबिले यांची वडमुखवाडी-अलंकापुरम रस्त्यावर फॉर्च्युनर गाडीत हत्या करण्यात आली होती. कारमध्ये तिघांमध्ये चर्चा झाली, मात्र वाद वाढल्याने अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांनी पिस्तुलातून नितीन गिलबिलेवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याचा मृतदेह गाडीतून फेकून देण्यात आला आणि त्याच्या पायावरून गाडी घालून दोघेही पसार झाले होते. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली असून एकूण चार जणांचा या हत्येच्या कटात सहभाग असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. अमित पठारे, विक्रांत ठाकूर, सुमित पटेल आणि आकाश पठारे अशी आरोपींची नावे असून यातील अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 21 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर दोन आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे.

दरम्यान दोन मित्रांनीच तरुणाची हत्या केल्याने नेमक्या कोणत्या कारणातून हे प्रकरण घडलं, याबाबत चर्चा सुरू होती. यावर पोलीस उपायुक्त मारुती जगताप यांनी भाष्य केलं आहे. “प्राथमिकदृष्ट्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून हा खून झाल्याचं कळत आहे. पण हा वाद नेमका काय होता आणि तो कधीपासून सुरू होता, हे काही दिवसांत स्पष्ट होईल. त्यादृष्टीने आम्ही आरोपींची चौकशी करत आहोत. या हत्येचा कट कधीपासून रचण्यात येत होता, हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!