एकनाथ खडसेंच्या बंगल्यावर डल्ला मारणारे चोर पोलिसांच्या जाळ्यात, त्या पेन ड्राईव्ह व सीडींचं काय झालं?, महत्वाची माहिती आली समोर…


मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या घरी झालेल्या चोरीप्रकरणात दोन जणांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री तथा विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील घरात चोरी झाली.

चोरांनी घरातील मौल्यवान वस्तू, पैसे आणि सीडी चोरल्या होत्या. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच चोरलेले मौल्यवान दागिने देखील पोलिसांना सापडले आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, एकनाथ खडसे यांच्या घरी झालेल्या चोरीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. जळगाव येथे घरफोडी केल्यानंतर आरोपींनी उल्हासनगर येथे चिराग सय्यद या व्यक्तीकडे मुद्देमाल सोपवला होता. तसेच चिराग सय्यद याने हा मुद्देमाल कैलास खंडेलवाल नामक सराफ व्यवसायाकडे दिला होता.

या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष घरफोडी करणारे तीन आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. एजाज अहमद, मोहम्मद बिलाल, बाबा अशी या मुख्य आरोपींची नावे आहेत. हे तिघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाल्यानंतर त्यांनी घरातून कागदपत्रे, सीडी व पेन ड्राईव्ह चोरी झाले असल्याचा दावा केला होता. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे, सीडी व पेन ड्राईव्ह आढळलेला नाही.

तसेच एकनाथ खडसे यांनी एफआयआरमध्ये तसेच पुरवणी जबाबात कागदपत्रे, सीडी व पेन ड्राईव्ह चोरी झाल्याचे म्हटले नसल्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!