लाडक्या बहिणींचं टेन्शन संपलं ; E-KYC करताना error, सरकारने सांगितली स्पष्ट केवायसीची वेळ..


पुणे : राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केली होती. त्यानुसार लाभार्थी महिलांना मागील वर्षी दरमहिना 1500 रुपये मिळत होते. निवडणुकीनंतर या योजनेत अनियमित्ता झाल्याचा प्रकार उघडकीस आला.या योजनेत सुरू असणारी बोगसगिरी नियंत्रणात ठेवण्यासाठी केवायसी करण्याचा निर्णय बंधनकारक करण्यात आला आहे.

लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन महिलांना दोन महिन्यांच्या आत केवायसी पूर्ण करायची आहे. मात्र ही केवायसी करत असताना महिलांना error किंवा ओटीपी न येणे,उशिरा येणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.आता यावर उपाय म्हणून सरकारने लाभार्थ्यांना केवायसी केव्हा केली पाहिजे याची वेळ सांगितली आहे. सरकारने लाभार्थ्यांना रात्री 12 वाजल्यानंतर किंवा सकाळी 4 – 5 च्या दरम्यान e-KYC करण्याचा सल्ला दिला आहे.

या वेळेत साइटवरील लोड कमी असल्याने Error ची अडचण येणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच, सरकारने e-KYC साठी दोन महिन्यांचा कालावधी पण दिला आहे.त्यामुळे घाई न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गरज पडल्यास हा कालावधी वाढवला सुद्धा जाऊ शकतो, असं देखील स्पष्ट करण्यात आल आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!