Breaking News : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे, शिंदे सरकारचा मोठा निर्णय..
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. शिंदे-फडणवीस सरकराने हा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.
तसेच फक्त निलंबन मागे घेण्यात आले नाही, तर त्यांचा जो निलंबनाचा काळ आहे, तो ते ड्युटीवर असल्याचे गृहीत धरले जाणार आहे. यामुळे परमबीर सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे सरकारच्या काळात त्यांच्याबाबत अनेक घडामोडींना घडल्या होत्या.
दरम्यान, परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याला 100 कोटी गोळा करण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर गृहमंत्र्यांवर कारवाई करण्यात आली होती. तेव्हा हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजल होत.
तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागलं होतं. त्याचवेळी परमबीर सिंह यांचं देखील निलंबन करण्यात आलं होतं. आता ही निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे.