सस्पेन्स संपला! यंदाचा अर्थसंकल्प ‘या’ दिवशी होणार सादर, वेळही ठरली


पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम या नवीन वर्षात म्हणजेच 2026 मध्ये देशाचा अर्थसंकल्प कधी सादर करतील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं असताना या अर्थसंकल्पाची तारीख आणि वेळ समोर आली आहे. यंदाचा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी 2026 ला म्हणजे रविवारी सादर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाईल.दरम्यान १ फेब्रुवारी रोजी गुरु रविदास जयंतीनिमित्त अनेक राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर होणार की नाही याबाबत प्रश्न निर्माण झाला होता.मात्र आता केंद्राचा अर्थसंकल्प रविवारी सादर केला जाणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यांमध्ये असणार आहे. २८ ते १३ जानेवारीपर्यंत पहिला टप्पा तर दुसरा टप्पा ९ मार्च ते २ एप्रिलपर्यंत असणार आहे. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी अर्थसंकल्प सादर करतील.

देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्वसामान्यांना काय फायदा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. देशाचा अर्थसंकल्प दरवर्षी जाहीर होतो.या वर्षीदेखील २०२६-२७ साठी अर्थसंकल्प सादर होणार आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७साठीच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!